आपल्याकडे चार प्रमुख वेदांच्या आणि वेदांगांच्या बरोबरीने
पुराणांचेही उल्लेख केले जातात. एकूण पुराणे आहेत १८. त्यातील अठरावे ‘ब्रह्मांड
पुराण’ हे अपूर्ण आहे. पुराण म्हणजे काय ? आपल्याकडे पुराण म्हणजे धर्मग्रंथ असं समजलं जातं,
परंतू पुराण हे काही मार्गदर्शक ग्रंथ नव्हेत ! पुराणाचा संबंध हा केवळ तत्कालीन
व्यक्तीमत्वांच्या वर्तनासाठी आणि घडामोडींसाठी लावता येऊ शकतो फारफार तर..
सगळ्यात सोप्या पद्धतीने समजून घ्यायचे असेल तर ‘पुराण
म्हणजे प्राचिन काळातील बखरी’ असा अर्थ लावला तरी काही
चूकीचे नाही !
आपल्याकडे बखर वाङमयात जसं एखाद्या घराण्याविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी जशी माहिती असते तसंच पूर्वी अशा देवदेवतांच्या अशा व्यक्तीपरीचय अथवा त्यांच्या गणाचा परीचय करून देण्यासाठी ही पुराणं लिहीली गेली आहेत. साधारणतः, जे ऋषी ज्या देवांची आराधना करायचे किंवा ज्यांना दैवत मानायचे त्या ऋषींनी त्या त्या देवांची पुराणं लिहून ठेवली आहेत. थोडक्यात काय, इतिहास संशोधन करताना जसं बखरीवर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही तसंच त्याकडे दुर्लक्षही करून चालत नाही. नेमकं हेच पुराणाच्या बाबतीतही आहे. पुराणात दिलेली सगळीच माहिती खरी असते असं नाही. अशी माहिती आपल्यालाच शोधावी लागते. कित्येकदा मानवी मनाला न पटणार्या अशा गोष्टी त्यात दिलेल्या असतात, ज्या सरळ सरळ समजून येतात. अशा गोष्टी पुराणात केवळ रंजकता आणण्यासाठी लिहीलेल्या होत्या. उदाहरणार्थ ब्रह्मदेवाला चार मुखे असणं इत्यादी. या गोष्टीचा विचारपूर्वक अर्थ असा लागतो, की हिंदुस्थानात (तत्कालीन आर्यावर्तात) पूर्वी असलेल्या जमातींना (मूळनिवासी द्रवीडादी लोक) पराभूत केल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी आर्यांची जनपदे निर्माण केली, चतुर्दिशांना आर्यांचा विस्तार केला. म्हणजेच चारही दिशांवर ज्याची नजर फिरते तो. केवळ हे लिखाणातून दर्शवण्यासाठी ब्रह्मदेवाला चार मुखांचा करण्यात आले असावे. या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. कित्येकदा आपल्या देवतेचे स्थान सर्वश्रेष्ठ ठरवण्यात ऋषींनी देवांची आत्यंतिक स्तुती केली आहे. परंतू अशी अतिशयोक्तीची माहिती वगळता त्यातील कथा आणि मजकूरावर विश्वास ठेवण्यात काहीच चूकीचे नाही.
आपल्याकडे बखर वाङमयात जसं एखाद्या घराण्याविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी जशी माहिती असते तसंच पूर्वी अशा देवदेवतांच्या अशा व्यक्तीपरीचय अथवा त्यांच्या गणाचा परीचय करून देण्यासाठी ही पुराणं लिहीली गेली आहेत. साधारणतः, जे ऋषी ज्या देवांची आराधना करायचे किंवा ज्यांना दैवत मानायचे त्या ऋषींनी त्या त्या देवांची पुराणं लिहून ठेवली आहेत. थोडक्यात काय, इतिहास संशोधन करताना जसं बखरीवर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही तसंच त्याकडे दुर्लक्षही करून चालत नाही. नेमकं हेच पुराणाच्या बाबतीतही आहे. पुराणात दिलेली सगळीच माहिती खरी असते असं नाही. अशी माहिती आपल्यालाच शोधावी लागते. कित्येकदा मानवी मनाला न पटणार्या अशा गोष्टी त्यात दिलेल्या असतात, ज्या सरळ सरळ समजून येतात. अशा गोष्टी पुराणात केवळ रंजकता आणण्यासाठी लिहीलेल्या होत्या. उदाहरणार्थ ब्रह्मदेवाला चार मुखे असणं इत्यादी. या गोष्टीचा विचारपूर्वक अर्थ असा लागतो, की हिंदुस्थानात (तत्कालीन आर्यावर्तात) पूर्वी असलेल्या जमातींना (मूळनिवासी द्रवीडादी लोक) पराभूत केल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी आर्यांची जनपदे निर्माण केली, चतुर्दिशांना आर्यांचा विस्तार केला. म्हणजेच चारही दिशांवर ज्याची नजर फिरते तो. केवळ हे लिखाणातून दर्शवण्यासाठी ब्रह्मदेवाला चार मुखांचा करण्यात आले असावे. या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. कित्येकदा आपल्या देवतेचे स्थान सर्वश्रेष्ठ ठरवण्यात ऋषींनी देवांची आत्यंतिक स्तुती केली आहे. परंतू अशी अतिशयोक्तीची माहिती वगळता त्यातील कथा आणि मजकूरावर विश्वास ठेवण्यात काहीच चूकीचे नाही.
शिवपुराणात
चोवीस हजार श्लोक आहेत, आणि एकूण सात संहीता आहेत. त्या अशा- विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटीरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायव्य संहिता. सूत ऋषींनी शिवपुराणाच्या सुरुवातीला, विद्येश्वर संहितेत म्हटलंय की शिवपुराणात एकूण १२ संहिता होत्या. वर
दिलेल्या सात संहितांव्यतिरीक्त विनायक, मात्री, एकादश रुद्र, सहस्र कोटी,
धर्म अशा आणखी ५ संहिता मूळ शिव महापुराणात आहेत. शिवपुराणानुसार, महादेवाने म्हणजेच शंकराने विष्णू आणि ब्रह्मदेवाला ‘पंचक्रिया’ सांगितल्या. या पंचक्रिया हे जग चालवणार्या
म्हणजे सृष्टी, स्थिती, संहार, त्रिभव (गुप्तता) आणि अनुग्रह अशा पाच क्रिया होत. हे जग म्हणजे ‘सर्ग’(आज आपण निसर्ग म्हणतो) अथवा ‘सृष्टी’. या सृष्टीची निर्मिती झाल्यावर असते ती ‘स्थिती’. या सर्गाची अथवा सृष्टीचा विनाश म्हणजे ‘संहार’. सृष्टीचा संहार म्हणजे जगाचा अंत असं नाही, तर आर्यांच्या वर्णाश्रमानुसार जे चार आश्रम आहेत त्यातील संन्यासाश्रम !
म्हणजे आपली आयुष्यातील कर्तव्ये करून झाल्यानंतरहे जग जणू आपल्यापासून गुप्त झालय, दूर गेलय अशी स्थिती ! या स्थितीला म्हणतात त्रिभव. यानंतर शेवटची क्रिया
अनुग्रहाची ! अनुग्रह म्हणजे मोक्षप्राप्ति !
या विद्येश्वर
संहितेत शिवलिंग कसे असावे याबाबत अत्यंत चिकित्सक माहिती दिलेली आहे. याच संहितेत
ब्राह्मण आणि क्षत्रिय कोणाला म्हणावे हेही सांगितले आहे. तसेच प्रणवाचे
(ओंकाराचे) र्हस्व आणि दीर्घ हे प्रकारही सांगितले आहेत.
रुद्र संहितेत
ब्रह्मदेव आणि नारद यांच्या संवादात ब्रह्मदेवाने नारदाला सृष्टीच्या
उत्त्पत्तीविषयी सांगितले आहे. यात सप्तऋषींचा जन्म, पार्वतीचा जन्म, तिचा शिवाशी विवाह, नंतर शिवपूत्र कार्तिकेय, गणेश यांचे जन्म इत्यादी सर्व वर्णन आहे. यानंतर युद्धकांडात तारकासुर, गजासूर, त्रिपूरासुर, बाणासूर
इत्यादी दैत्यांच्या विनाशाचे वर्णन आहे.
शिवपुराणात
ब्रह्मदेवाने (नारदाला, आणि अर्थात आपल्यालाही) स्पष्ट सांगितले आहे की प्रत्येक कल्पात
निरनिराळे गणेश असतात. श्वेतकल्पाच्या या काळात गणेशाने शिव-पार्वतीचा पुत्र
म्हणून जन्म घेतला. केवळ या श्वेतकल्पाच्या काळातच गणेश हा गजमस्तकी होता. गणेश या शब्दातचत्याचा अर्थ दडलेला आहे. गण म्हणजे आर्यांचा समुह. या
समुहाचा अधिपती म्हणजे गणाधिपती-गणपती, अथवा या समुहाचा
वंदनिय ईश (देव) म्हणजे गणेश.
शतरुद्र संहितेत
शिवाच्या पाच अवतारांविषयी सांगितलेले आहे. हे पाच अवतार म्हणजे सधोजत (सद्धोजत), नामदेव, तत्पुरुष, घोरेष (अघोर शिव) आणि ईशान.
याव्यतिरिक्त सुतऋषींनी शिवाची आठ रुपं सांगितली आहेत ती म्हणजे शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि
महादेव. शिवाची ही आठ रुपं म्हणजे सृष्टीच्या उत्त्पत्तीसाठी कारणीभूत असणार्या
आठ घटकांची प्रतिके आहेत. हे आठ घटक म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश, जीवात्मा, सूर्य आणि चंद्र होत. यानंतर या संहितेत
नंदिकेश्वर (नंदी), व्यासमुनी आणि शिवाच्या गृहपती, यक्षेश्वर, महांकाल अशा निरनिराळ्या अवतारांविषयी
वर्णन केलं आहे. शिवाय कश्यपाच्या आग्रहावरून दानवांच्या संहारासाठी शिवाने ज्या
अकरा रुद्रांचा अवतार घेतला ते अकरा रुद्र म्हणजे कपाली,
पिंगल, भीम, विरुपक्ष, विलोहित, शस्त्र, अजपाद, अहिर्बुज्ञ, शंभू, छंद आणि भव
!
यानंतर
कोटीरुद्र संहितेत बारा ज्योतिर्लिंगांची उत्त्पत्तीकशी झाली त्याचं वर्णन केलं
आहे. यातच नरकाची कल्पना आहे. जमिनीपासून ८६ हजार योजने (१ योजन म्हणजे ८ मैल)
अंतर अवकाशात यमदेवाची यमनगरी म्हणजेच नरक असल्याचं सांगितलं आहे. अर्थातच, ही केवळ एक
मनोरंजक कथा अथवा कल्पना आहे हे आज कोणीही सांगू शकतं.
वायव्य संहितेत
निमिष, मास, युग अशी कालगणना वर्णन केली आहे. हवन कसे
करायचे हे आणि यासोबतच योगाचेही पाच प्रकार सांगितले आहेत ते म्हणजे मंत्र योग, स्पर्ष योग, भव योग, अभव योग
आणि महायोग !
एकूणच, शिवपुराण
हे असं आहे. काही लोक उगाचच, शैव आणि वैष्णव असा वाद पुन्हा
उकरून काढून हिंदू-हिंदूंच्यातच पुन्हा दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिव हे
पूर्वीपासून आर्यांचं दैवत होतं. मूळात, आपल्याकडे शिव आणि
शक्ती ही दैवी सामर्थ्याची दोन रुपं मानली गेली आहेत. अगदी सिंधू संस्कृतीपासून ते
आर्यांपर्यंत. किंबहूना सिंधू संस्कृती ही सुद्धा आर्यांचीच असल्याचे सिद्धांत आज
मांडले जात आहेत. कारण, सिंधू संस्कृतीत सापडलेल्या
अश्मचित्रांवरून आणि अवशेषांवरून तत्काली शिवाची आराधना केले जात असल्याचे दिसून
येते, काही ठिकाणी शिव ध्यानस्थ बसला असल्याची चित्र कोरलेली
आहेत. ध्यान-योग हे वैदिक संस्कृतीचं देणं आहे. त्यामूळेच,
सप्तसिंधूच्या आसमंतात उतरलेल्या आर्यांची प्राथमिक पायरी ही सिंधू संस्कृती
(हडप्पा संस्कृती) असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याला आणखीएक सबळ पुरावा
असा, की हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, सुरकोटडा, कालिबंगन
येथील उत्खननात सापडलेल्या नगरांच्या अवशेषांची आणि दिल्लीजवळ सापडलेल्या पुरातन
आर्यांच्या इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर इत्यादी नगरांची रचना ही
बहुतांशी एकसारखीच आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, की
हडप्पा संस्कृतीत सापडलेल्या शिलालेखांवरील भाषा ही अत्यंत सांकेतीक आहे. ती
अजूनही पूर्णतः वाचता येऊ शकलेली नाही. प्राणनाथ बारुआ, जॉन
मार्शल, जी. आर. हंटर यांच्यासारख्या विद्वानांना ती थोडीफार
समजण्यात यश आलं आहे. त्यामूळे, सिंधू संस्कृती वेगळी आणि
आर्य वेगळे, आर्य हे परके आहेत अथवा आर्यांनी वैदीक व्यवस्था
आपल्यावर लादली इत्यादी गैरसमजांवर सुज्ञ माणसांनी तरी विश्वास ठेवू नये. आर्यांनी
सुरुवातीला त्रैवर्ण्य आणि नंतर चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार केला ही गोष्ट
खरी आहे, आणि तत्काली वर्ण हे वंशपरंपरागत नव्हते. जातींची
उत्त्पत्तीही तेव्हा झालेली नव्हती. जातिंची उत्त्पत्ती ही साधरणतः नवव्या-दहाव्या
शतकापासून सुरू झाली. तत्काली माणसा-माणसात कोणताही भेदभाव असण्याचा प्रश्न
नव्हता. यामूळेच वराहमिहीर, धंन्वंतरी,
अश्विनीकुमार, च्यवन असे एकाहून एक श्रेष्ठ वैद्यकशास्त्रज्ञ
आर्यावर्तात होऊ शकले. साडेतीन हजार वर्षापूर्वी लिहील्या गेलेल्या ‘वेदांगाकल्पा’तील ‘शल्वसूत्रात’ पायथ्यॅगोरसचं प्रमेय (ԓr2 ) आहे. ԓ ची
किंमतही ३.१४१५९ ही आपल्याला माहित होती. पाचव्या शतकात आर्यभटांनी मांडलेला
पृथ्वीच्या परिवलनाचा आणि परिभ्रमणाचा सिद्धांत, पृथ्वीचा परिघ हे यानंतर
सुमारे एक हजार वर्षांनंतर कोपर्निकस-गॅलिलिओ आदी शास्त्राज्ञांनी जगापुढे मांडलं.
पृथ्वीचा परिवलनकालही आर्यभटांनी अचूक मांडला होता, तोही
केवळ ज्ञात गणिताच्या आधारावर ! त्यामूळे, आर्यांनी
वर्णव्यवस्थेद्वारे अधोगती मांडली, भारताला जगाच्या मागे
नेले, इथल्या लोकांचा छळ केला इत्यादी गोष्टी सगळ्या खोट्या
आहेत. ज्यांना असे जावईशोध लावायचे त्यांनी खुशाल लावावेत. पण निदान, लोकांनीतरी आपला सुज्ञपणा आणि विवेक जागृत ठेवून अशा भाकडकथांवर विश्वास
ठेवू नये. कारण हेच लोक स्वतःची जात कोणती आणि तीच कशी सर्वोत्तम आहे अशा
पवित्र्यात भाषणंठोकत असतात. नदीत बुडत्या माणसाला घाटावर बसून उपदेश करणार्यांची
संख्या आपल्याकडे कमी नाही हेच खरं...
बहुत काय लिहीणे
? या सार्या प्रपंचामागचा माझा हेतू आपल्या ध्यानात आला असेलच. आपण सर्व
थोर सुज्ञ आहात. आमचे अगत्य असू द्यावे ही नम्र विनंती.... राजते लेखकावधी ॥