'समर्थ'ची प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी दि. ३० मे २०१९ पर्यंत पुढील दुकानांमध्ये सुरु आहे

अक्षरधारा बुक गँलरी, पुणे । पाटील एंटरप्राईजेस, पुणे । उज्ज्वल बुक डेपो, पुणे । न्यू नेर्लेकर बुकसेलर्स, पुणे । नेर्लेकर बुक डेपो, पुणे । अशोक अनंत नेर्लेकर, पुणे । वर्मा बुक सेंटर, पुणे । उत्कर्ष बुक सर्व्हीस, पुणे । अभंग बुक डेपो, पुणे । पुस्तकपेठ, पुणे । सरस्वती ग्रंथ भांडार, कल्याण । मॅजेस्टिक बुक हाऊस, डोंबिवली । गद्रे बंधू, डोंबिवली । श्रद्धा प्रकाशन, डोंबिवली । विनीत बुक डेपो, डोंबिवली । मँजेस्टिक बुक डेपो, ठाणे । आयडियल बुक कंपनी, दादर, मुंबई । भारतीय पुस्तकालय, लातूर । मराठी दालन, लातूर । साहित्य प्रसार केंद्र, नागपूर । मेहता बुक सेलर्स, कोल्हापूर । बुक गंगा, पुणे । जितेंद्र जैन, औरंगाबाद । प्रशांत सबनीस,सातारा । भूषण उद्योग, अकोला । महाराष्ट्र बुक डेपो, पुणे । उदय एजन्सीज, अहमदनगर । अभिनव बुक डेपो, नाशिक । जवाहर बुक डेपो, विलेपार्ले

चिमाजी अप्पांचे नानासाहेबांना स्वहस्ताक्षरातील पत्र

श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या अनुपस्थितीत चिमाजी आप्पांनी नानासाहेबांना  पाठवलेले  पत्र...      दि. १ मे १७३७


श्री
चिरंजीव राजश्री नाना यांस चि
मणाजी बलाल आसिर्वाद उपरी
येथील कुशल ता। छ ११ मोहर
म यथास्थित असे विशेष मा
तुश्रीबाई समुद्रस्नान करणे
आहे म्हणून पावसाला बोलली हो
ती याकरीता अमवाशे आलिकडे
च्यार दिवस येथे पावणे म्हणजे
अमवाशेस स्नान करून स्वार
जर त्यांच्या पायाचे दुख बरें
जालें नसलें आणि त्यांच्या विचारें
तूर्त यावेसे नसले तर त्यांचे रा
हणे होईल त्यांचे राहणे जालें
तर जनार्दन त्यांजवळ राहील
रघुनाथ सदशिव यांस मातु
श्री समगमे पाटवणे मातु
श्रींच्याही विचारे तूर्त यावेसें
नसले तर कोणासही पाटवाव
याचे प्रयोजन नाही हे आशि
र्वाद.
         
मोडी : देवनागरी लिप्यंतर – कौस्तुभ कस्तुरे