मराठी दफ्तर रुमाल २ : दुसर्‍या बाजीरावांचे वि. ल. भावे यांनी केलेले विश्लेषणमराठी दफ्तर रुमाल दुसरा, लेखांक ३, पेशवे घराण्याची हकीगत

या रुमालातलें लेखांक १- बापू गोखले यांची कैफियत व लेखांक २- सातारकर महाराजांची दिनचर्या हे वाचून झाले म्हणजे म्हणजे श्रीमंत बाजीराव रघुनाथाबद्दलचे आपले विचार सहजासहजी बदलू लागतात. लागतात. लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलेल्या कल्पना हळूहळू झडू लागतात. बाजीराव अगदी आयदी वा पळपूटा असून केवळ ऐषआरामाचे सुख शांततेने भोगण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या हातावर मराठी राज्याचे उदक घातले घातले ही कल्पना तर तर अगदीच साफ लयास जाते. इतकेच नव्हे, तर मराठ्यांचे राज्य राखण्यासाठी त्याने आपल्या शक्तीप्रमाणे आटोकाट प्रयत्न केले हे म्हणणे भाग पडते.


अगदी अखेरपर्यंत तो सारखा झगडत होता.इंग्रजांचा पाय मराठी राज्यातून काढून टाकावा यासाठी त्याने अनेक कारस्थाने केली. लक्षावधी रुपये खर्च केले. .व शेवटी खालावलेल्या स्थितीतही एक कोट रुपये त्यानें आपल्या विश्वासातल्या सरदाराजवळ सैन्य उभारण्याकरता दिले; धुळपास सांगून सांगूनारमाराचे डागडुजीचे काम चालविले; भोसले यांस वस्त्रे पाठविली. काळे, मेहेंदळे वगैरे बिनसलेल्या सरदारांना लोभ दाखवून त्यांस लढाई देण्यास वळविले. अशी त्याने लढाईची तयारी केली वा शत्रूस तोंड दिले. प्रत्यक्ष युद्धात लढाईचे दिवशी त्याला कूच करून (सुरक्षित ठिकाणी) जाण्याविषयी त्याचा मुख्य सेनापती गोखले याने सांगितले असताही तो अखेरपर्यंत गेला नाही. इतकेच नव्हे, तर असा सल्ला वारंवार दिल्याबद्दल त्याने आपल्या सेनापतीस दोष दिला. आपलें बरोबरच्या ईमानी शिपायांस व सरदारांस सोडून तो स्वसंरक्षणार्थ पळाला नाही. उलट त्याचे सरदार वा शिपाई मात्र त्यास सोडून ऐन प्रसंगाचे वेळी पळून गेले. गोड घास सुखाने मिळत होता तोपर्यंत त्यांनी येथेच्छ आकंठ खाल्ला. पण आपल्या अन्नदात्यावर संकट येताच ते मतलब साधून दूर सरले. बाजू सावरून धरणेची आशा आहे तोपर्यंत तोपर्यंत छातीचा कोट करून कोणीही शहाणा सरदार सैन्यास धीर देत उभा राहील. पण जो बाजू पूर्णपणे अंगावर येते असे दिसत असतांही शिपायांना नशिबाचे स्वाधीन करून पाय काढणार नाही तोच धनी खरा ! बाजीराव नुसता एकटाच सैन्यात होता असे नाही, तर आपले बायकोस मर्दानी पोषाख चढवून चढवूंत्याने तीस सैन्यात बरोबर घेतली होती. आपल्या पती बरोबर मृदूशय्येवर आणि समरांगणात दोन्हीकडे सारख्याच उल्हासाने असणार्‍या स्त्रियांची उदाहरणे युरोपातच कायकाय, पण महाराष्ट्राबाहेरही फार क्वचितच आढळतील. आता सैन्याचा मोड होऊ लागला असता तेथून कूच करून दुसरीकडे जाणे जाणेवा तेथे पुन्हा तोंड देणे याला कोणीही पळून जाणे म्हणत नाही. असा कोणता सरदार आहे की साधत असता हे ज्यानें केले नाही ? मग बाजीरावालाच पळपूटा म्हणावे हा कोठला न्याय ? ज्याचा डाव साधला तो शहाणा, व ज्याचा डाव गेला तो मूर्ख हाच एक जगातलां न्याय आहे, दुसरे काय ?

हे असो ! पळाला कोणकोण, किंवा अमुक पळपुटा होता की नाहीनाही, यापेक्षा मराठ्यांचेराज्य आत्मसुखाकरता परकियांच्या हातात कोणी दिले हा प्रश्न विशेष महत्वाचा आहे ! शेवटील झटापटीपूर्वी दोन तीन वर्षे सातारच्या छत्रपतींनी इंग्रजांशी गुप्त खलबत करून करुन काही संकेत ठरवला होता. वा आपण होऊन इंग्रजांना स्वाधीन होण्याविषयी करार मदार केला होता. या गोष्टीचा संशय किंवा सुगावा बाजीरावाला होता वा आपल्या खावंदांच्या या चाळ्याने राष्ट्रावर येणारा अनर्थकारक प्रसंग प्रसंगा टळावा म्हणून त्याने त्याला आपल्या बरोबर नजरेखाली घेतले होते. पण तितक्यातूनही संधी काढून तो धनी इंग्रजांच्या स्वाधीन झालाच. घरचा मालक, राज्याचा खावंद, स्वतः छत्रपती महाराज जर आपणा होऊन उठून जाऊन शत्रूच्या स्वाधीन झाले तर त्याच्या मुनिमाने काय करायचे होते ? फ्रान्सच्या लुई राजाने राजाने व त्याच्या राणीने आपल्या लोकांचे नुसते बेत परकीयांस कळवलेळवले, किंवा आपल्या आप्तेष्टांस आपल्या मदतीस म्हणून बोलावले तेव्हा त्यांच्या प्रजेने काय केले ? पण त्यावेळी फ्रेंच लोक वेडावून गेले होते व वेडाच्या भरात त्यांनी अनन्वित कृत्ये केली; असे कोणी म्हणेल. याकरता हा दाखला आपण सोडून देऊ व क्षणभर अशी कल्पना करू की गेल्या महायुद्धाचे वेळेस आपले बादशाहा पंचम जॉर्ज हे जर जाऊन कैसरच्या स्वाधीन होण्याचा यत्न करते, किंवा जर्मन सेनापतींशी आपल्या प्रधानमंडळाविरुद्ध त्यांनी नुसता पत्रव्यवहार ठेवला असता तर आस्क्विथसाहेब किंवा लॉईड जॉर्ज यांनी त्याचे त्याचे काय केले असते ? याचे उत्तर एखादे लहान पोर देखिल देईल. ग्रीसचा राजा कॉन्स्टेंटाईन याचे त्याचा प्रधान व्हेनिज्युलास याने परवाचे दिवशी काय केले व इंग्रजांनी त्याबद्दल व्हेनिज्युलासची किती पाठ थोपटली हे जाहीर आहे. तेव्हा आणिबाणीच्या वेळी व राष्ट्रांत युद्धप्रसंग चालू असतां तेथील राजा झाला म्हणून त्याने कसे वागावे हा सिद्धांत ठरलेला आहे. या सिद्धांताविरुद्ध वागणार्‍या राजाला कोणती बक्षिसी देणे राष्ट्रीयदृष्ट्या आवश्यक आहे हे ही उघडच आहे. यात अदब राखण्याच्या, दयेच्या, धर्माच्या किंवा दुसर्‍या कोणत्याही सबबीने गय केली तर त्याचा परिणाम कसा घडतो हे कोणीही सांगू शकेल. त्यावेळी राष्ट्राची सुत्रे ज्याच्या हातात असतील,राष्ट्रसंरक्षणाची जबाबदारी ज्याचे शिरावर असेल त्याने असा मनुष्य देशद्रोही वा राष्ट्रद्रोही ठरवून ज्यांना मराठी राज्याची पोटतिडीक आहे असे जाधव, शिर्के वगैरेंसारखे चार कुळवान मराठा सरदार जमवून व त्यांचेपुढे हा आरोप शाबित करून त्यांचे सल्ल्याने सर्वांसमक्ष त्याला झाडावर टांगून देहांत प्रायश्चित्त देणे अवश्य वा न्याय्य होईल. आणि हे करण्याची हिंमत बाजीरावाने केली नाही म्हणून राज्य गमवून, राष्ट्राचा नाश करून तो फजित पावला व लोक त्याला बेहिंमती, कमअकली, धोरणशून्य आणि मूर्ख म्हणू लागले.

या संदर्भात सातारकर महाराजांतर्फे एक म्हणता येते की त्यांस बाजीरावाने कैदेत ठेवले होते वा त्यांची आज्ञा त्याने शिरसावंद्य केली नाही म्हणून ते शत्रूस जाऊन मिळाले. पण हे म्हणणे फारसे टिकाऊ नाही. बाजीराव हा गादीचा एक नोकर होता. त्यास महाराजांनी दूर करून त्याची खोड मोडावयास पाहिजे होती. त्यास काढून वा काढल्याचे जाहीर करून कोणीही दुसरा इसम ते त्या जागी नेमते, किंवा स्वतःच कारभार पाहते तरी उत्तम झाले असते. पण तेवढा आटोप महाराजांत नव्हता. आणि असें होते तर त्यांनी आपल्या गादीवर दुसरा कोणी पराक्रमी पुरुष नेमावयाचा होता. किंवा प्रतिनिधीच्या अथवा चिटणीसाच्या हाती कारभार द्यावयाचा होता. पण तसे ना करता ते जाऊन शत्रूच्या अंकीत झाले. परक्या सैन्याच्या जोरावर जो राजा आपला अंमल बसवू पाहतोतो नेहमी फसतो. शत्रूच्यामदतीने जो राजा आपल्या राजधानीतप्रवेशकरतो त्याचेहातात ती राजधानी फार काळ कधिःही टिकत नाही. महाराज, महाराजांचे चिटणीस, त्यांचे खानदानी सल्लागार या सगळ्यांचीच अक्कल कशी गेली याचे फार नवल वाटते. इंग्रजांनी राघोबादादाला वा त्याचे मुलाला अडचणीत गाठून त्याजपासून राष्ट्राला परिणामी घातक असे तह करून घेतले, वा या बापलेकांनी पेचात सापडून ते करून दिले हे खरे आहे.....

हा लेखांक वाचला म्हणजे बाजीरावाने स्वराज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर घातले हे म्हणणे लुळे पडते. स्वराज्यावर तिलांजली देऊन सातारकर महाराजांनी आपण होऊनइंग्रजांच्या हातावर उदक घातले ही गोष्ट स्पष्ट होते. या दानाची सामग्री करून त्याचे सर्व मंत्र महाराजांच्या चिटणीसांनी म्हटले होते....

बाळाजी विश्वनाथापासून चार सहा पिढ्या पेशव्यांच्या पुरुषांनी कमरेला तलवार बांधून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सतत गस्त घातली. सदैव महाराष्ट्राची कोतवाली केली. महाराष्ट्राने स्वस्थ निजावे या करीताते रात्रंदिवस जागत राहिले राहिलेवा अनेक संकटे भोगलीती सर्व लयास गेली. राघोबाने वा बाजीरावाने दरवाजाची दिंडी उघडून इंग्रजांस आत घेतले हे खरे असलेतरी आत आलेल्याला बाहेर घालवणे आणि नोकरांना नतिजा पोचविणे हे घरच्या घरधन्याचे काम होते. आता अगदी शेवटी माल्कम साहेबानी बाजीरावा जवळून ब्रह्मावर्तास स्वस्थ बसण्याचा करार करून घेतलावा तो त्यांनी करून दिला हा दोष कोणी बाजीरावावर लादू पाहील. पण बाजीरावाच्या पदरी हा ही दोष कोणा विचारवंताला बांधता येणार नाही. कारण माल्कमसाहेबाचा करार ता ४ जून १८१८ रोजी झाला. व यापूर्वी बरेच दिवस, म्हणजे दोन महिने पूर्वी बाजीरावास सातारकर महाराजांनी पेशवाई पदावरून दूर करून बंड ठरविल्याचे दि ४ एप्रिल १८१८ रोजी जाहीर केले होते. त्यामूळे हा करार केला त्यावेळी बाजीराव हा पेशवानव्हता. राज्याची कोण्याही प्रकारची मुखत्यारी सातारकर महाराजांनी त्याच्याकडे ठेवली नव्हती. त्यावेळी बाजीराव हा कोणी जबाबदार मनुष्य नसून खासगी ईसम होता वा या नोकरीवरून दूर केलेल्या ईसमाने स्वतःच्या पोटाची व्यवस्था केली ईतकेच. ज्यांनी शिवाजीमहाराजांचीआणि त्यांच्यावंशजांची पाच सात पिढ्या नोकरी बजावली बजावली व औरंगजेबाने नामशेष केलेल्या शिवाजीच्या वंशजांना हिंदुस्थानात अत्युच्च पदावर नेऊन बसवले वा त्यांच्या पुढे प्रत्यक्ष दिल्लीच्या बादशहांना लवावयास लाविले त्या भटांच्या वंशजाला परकीयांच्या चिथावणीने प्रतापसिंहानी नोकरीवरून दूर करून बंड ठरविले आणि त्याला व त्याच्या कुटूंबातील सर्व माणसांना दोन प्रहरच्या अन्नाच्या घासाला मोताद करून सोडले सोडले तेव्हा आपल्या अन्नाची सोय लावून घेणे त्याला भाग पडले यात चूक ती काय ?

बाकी बाजीरावात असावी तितकी कर्तबगारी नव्हती हे उघड आहे. त्याच्या नावावर अनंवित कृत्ये व असह्य जुलूम करून दौलतराव शिंद्याने सर्व पुणे शहराला त्याचा वीट आणला होता. त्याचे बहूतेक हस्तक व सरदार शत्रूच्या जाळ्यात गुंतले होते. वा आपमतलबानेते त्याच्या मानेवर फिरवण्यासाठी सुर्‍या पाजवीत होते. इंग्रजांनी त्याचे घर पोखरून टाकले होते व सावकारांनी त्याला गिळला होता. उठावे त्याने लचके तोडावे अशी त्याची कुतरतोड झाली होती. आजाची अक्कल नातवात नव्हती असे उघड दिसते. पण याच्या पलिकडे जाऊन आपण बाजीरावावर नसते आरोप करतो वा काही त्याच्या अंगी नसलेले दुर्गुण चिकटवू पाहतो तेव्हा मात्र आपण सपशेल गोत्यात पडतो. कोणी कोणी बाजीरावाला फार खादाड वा मोठा खर्चिक म्हणतात. पण उपलब्ध हिशेबावरून हे खरे दिसत नाही. वर्षानुवर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या दरिद्री कपाळ करंट्यांनी आपल्या भिकार राहणीशी हिंदुस्थानात सर्वात खानदानी राहनीच्या व सात पिढ्यांच्या श्रीमंतीची राहणी तोलून पाहून त्या राहणीला व भोजनाला उधळपट्टी म्हणावी हे साहजीक आहे. वस्तुतः बाजीराव आपला खर्च कसोशिने करीत असे असे पेशव्यांचा बखरकार म्हणतो. बरं पेशव्यांचा कट्टर शत्रू एलफिन्‍स्टन काय म्हणतो पहा- “ He was frugal but not parsimonious in his expenses & at once courteous & dignified in his manners (Life of elphinstone Vol I- page 289) ”

बाजीराव हा निर्दय, क्रूर किंवा पाषाणहृदयी होता असे तर त्याचे शत्रूही म्हणणार नाहीत. त्याचेवर गंगाधरशास्त्र्याच्या खुनाचा आरोप इंग्रज ग्रंथकार करतात, पण हा आरोप सपशेल खोटा दिसतो. खुनाच्या साध्या खटल्यात देखिल आरोपाची शाबिती होण्याला प्रत्यक्ष पुरावा लागतो वा तसा खोटा पुरावाही पोलिसांना सहज मिळू शकतो. पण या भर दिवसा, ऐना चव्हाट्यावर झालेल्या खुनाबद्दल असा काडीभरही पुरावा पुढे येत नाही. सगळी मदार तर्कावर बांधलेली दिसते. गंघाधरशास्त्र्याचे वंशजांची कैफियत बडोद्याचे सरकारचे हुजूर कचेरीत तयार होऊन छापली आहे. तिजवरून यात बाजीरावाचा संबंध दिसत नाही. इतकेच नव्हे, तर त्यांतील एकंदर हकीकतींवरून शास्त्रीबुवांचा घात करण्याची क्लृप्ती पेशव्यांची खास नसून त्या घाताबद्दल ते फारसे गणले जाणार नाहीत हे निश्चित होते. नारायणरावाच्या हत्येने डागलेला, वा नारायणरावांच्या काल्पनिक पिशाच्चांच्या भितीने पूर्ण पछाडलेला बाजीरावासारखा धर्मभोळा मनुष्य पंढरपूरसारख्या पवित्र क्षेत्रात खून करवील हे बिलकूलच संभवनिय नाही. खूनच करणे तर पुण्यास हस्तक काय कमी होते ? आडवाटेतल्या जागा काय ओस होत्या ? त्याच्या डोळ्याचे पाते जरा लवले असते किंवात्याने डोळा गिरकावून जरा वाकड्या नजरेने पाहीले असते तर शेकडो तरवारी आपली म्यानें भिरकावून गंगाधरशास्त्र्याच्या शारिरांत घुसल्या असत्या. मग त्याला असा हा नीच मारेकरी घालून खून करवण्याची गरजच काय ? आणि तोही पंढरपूर क्षेत्रात ! एका हत्येच्या परिमाजनार्थ तो पाण्यासारखा पैसा खर्च करीत होता, दानधर्म व प्रायश्चित्ते घेत होता व जो त्यासाठी पंढरीस नित्य येरझार्‍या घाली तो बाजीराव दुसरी हत्या आणि ती ब्राह्मणाची, तीही पंढरपूर क्षेत्रात, नगर प्रदक्षिणेच्या वाटेवर शास्त्री देवळातून येत असता कोणा नीचावाटे करील हे अशक्य आहे. आणि या कृत्याला निंबगाव जावळीचा पाटील त्रिंबकजी अनुकूल होईल हे तर अगदीच अशक्य आहे. त्रिंबकजी हा पंढरीचा मोठा भक्त होता. तुकारामाचे अभंग फार प्रेमाने मिळवून, ते जमवून उतरवून ठेवण्याचा त्याला मोठा नाद असे.

क्षणभर ही धार्मिक दृष्टी बाजूला ठेवली, तरी नारायणरावांच्या मरणामूळे एकंदर मराठमोळ्यात आपणांस केवढा डाग लागला होता व त्यामूळेकिती चांगले लोक आपल्या विरुद्ध गेले होते, त्यामूळे आपल्या वडिलांना आणि आपल्याला काय काय सोसणे भाग पडले होते हे बाजीरावांना चांगलेच ठावूक होते. हे नीट जाणत असूनही हा दुसर्‍या हत्येचा आरोप आपल्यावर येऊ देईल इतका तो वेडा नव्हता. या योगाने पुष्कळ मराठ्यांची मने आपल्या विरुद्ध फिरतील व लोकांत आपलीबदनामी होईल आणि राजकारणात नसते बखेडे माजतील हे जाणण्याईतकी अक्कल बाजीरावात खासच होती.

गंगाधरशास्त्री पटवरधनाच्या खुनाशी बाजीरावाचा संबंध नव्हता या गोष्टीला आणखी एक पुरावा आहे. गंगाधरशात्री पटवर्धन आणि प्रभाकरतात्या कवी (शाहीर) हे दोघे लहानपणापासूनचे सोबती होते. व त्यांचा स्नेहसंबंध आजन्म कायम होता. एकमेकांविषयी दोघांचे प्रेम इतके होते की गंगाधरशास्त्र्याच्या मुलास- आबासाहेबास- प्रभाकरतात्याची मुलगी केली होती. तेव्हा गंगाधरशास्त्र्याच्या खुनात बाजीरावाचा संबंध असता तर या गोष्टीचा उल्लेख प्रभाकराने आपल्या कवनात निःसंशय केला असता. या खुनाचा उल्लेख प्रभाकराच्या कवनांतून आहे, पण प्रभाकर शास्त्रीबुवांच्या खुनाचा आरोप तसुभरही बाजीरावांवर करत नाही. गंगाधरशास्त्री पटवर्धनांची कन्या गं. भा. श्रीमती यमुनाबाई याही आपल्या वडिलांच्या खुनाचे आरोप बाजीरावांवर करत नाहीत. सारांश, गंगाधरशास्त्री पटवर्धनाचे वंशज, त्यांची कन्या, त्यांचे लहानपणापासूनचे मित्र, त्यांचे व्याही, सोयरे, इतर आप्तसंबंधी तसेच तत्कालीन सरदार मंडळीत वागणारे कवी हे या खुनाचा धागा बाजीरावाला लावित नाहीत.

आता आमचे इतिहासकार बाजीरावाला दोषी ठरवतात. परंतू ही राजनिती आहे. दुसरे काय? राजकारणात आणि राजनीतीत काहीही चालते. ज्याने डाव जिंकला तो शहाणा, तो सज्जन, तो थोर, तो सकलगुणसंपन्न असे यात ठरते. लबाड्या, खून, खोटे कागद, लाचलुचपत, चहाडी, विष्वासघात, कृतघ्नता हे सर्व या नीतीतअवगुण नसून गुणच ठरतात.

एलफिन्स्टन म्हणतो, “गंगाधरशास्त्र्यास वकीलीवर आम्ही नेमले होते. सबब त्याचे संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर येते”. हे जरी खरे मानले तरी या जबाबदारीकरीता एलफिन्स्टन साहेबाने काय केलेत्याचे तैनातीस त्यांनी एका तरी शिपाई ठेवला होता का? बरे, तो मारला गेल्यावर त्याची नुकसान भरपाई इंग्रजांनी त्याच्या वंशजांना कितीशी दिली? या प्रश्नांवरून एलफिन्स्टनला गंगाधर शास्त्र्याची किती काळजी होती हे समजून येते.

यावेळी इंग्रजांवर स्वारी करण्याची आवश्यकता बाजीरावांस निकट जाणवली होती, व या आपल्या स्वारीस श्रीमंत महाराज प्रतापसिंह यांची मंजुरी घेण्यासाठी बाजीरावांनी माहुली मुक्कामी भेट घेतली आणि त्यांस सांगितले की इंग्रज यांचा व आमचा बिघाड झाला आहे. हे बोलणे बोलून बाजीरावांची पाठ फिरली न फिरली तोच सातारकर महाराजांनी बळवंतराव चिटणीस यांस आज्ञा केली की हा मजकूर आलपिष्टन बहादूरयांस कळवावा. आणि त्याप्रमाणे आपल्या पेशव्याने केलेल्या मसलतीची बित्तम बातमी महाराष्ट्राच्या या मालकाने महाराष्ट्राच्या शत्रूंस ताबडतोब कळवली. बाजीरावांना प्रतापसिंहांची ही लक्षणं पूर्वीपासूनच माहित असल्याने त्यांनी प्रतापसिंहांना नजरकैदेत ठेवले होते. पुढे अर्थात, पेशव्यांना दूर केल्यावर काही वर्षे सातारकर महाराजांना राज्यनशिबास आले, पण काही काळातच एलफिन्स्टनने त्यांना दूर केले अन्‍ मग रंगो बापुजीचे राज्यासाठी इंग्रजांकडे हेलपाटे सुरू झाले. सातारकर महाराजांना गादीवर बसवणे व त्यांच्या हातून जाहिरनामे काढवणे हेच महाराष्ट्राचे राज्य साधण्याचे उत्तम साधन आहे असे इंग्रजांनी ठरविले. महाराष्ट्राच्या सिंहासनावर चढण्याची सातारकर महाराजही एक सोयिची पायरी आहे असे जाणून त्यांनीती पायरी सोयीसाठी पुन्हा उभी केली व आपले कार्य उरकून महाराष्ट्राचे सिंहासनावर चढल्यानंतर त्यांनी त्या पायरीची वाटेल ती वाट लावली. सुमारे पंचवीस-तीस पावसाळे लोटले नाहीत तोच त्यांनी ती पायरी उचलून दूर भिरकावून दिली. सातारकर महाराज प्रतापसिंह यांना काशिस नेऊन टाकले याप्रमाणे करून त्यांस व त्यांच्या पेशव्यांस गंगास्नान करून स्वस्थ बसणे भाग पडले. सातारकर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज व त्यांचे पेशवे असे दोघेही जण जे एकदा महाराष्ट्राबाहेर गेले ते कायमचेच गेले. त्यांचे पाय पुन्हा महाराष्ट्रास लागले नाहीत. मराठ्यांनी मोठ्या अभिमानाने स्थापलेल्या सातारच्या गादीची यापुढे झालेली विटंबना व त्या गादीच्या खावंदांची दैना महाराष्ट्राच्याने खासच ऐकवणार नाही अशी ती हृदयविकारी आहे. कडू बदामाच्या व आक्रोडाच्या झाडाला पन्नास-साठ वर्षांनी फळे येतात असे म्हणतात. परंतू प्रतापसिंह महाराजांनी रुजवलेल्या या कारस्थान वृक्षाला तीस पस्तिस वर्षातच फळे आली आणि ती त्यांस, त्यांचे वंशजांस व त्यांचे सेवक जे आम्ही महाराष्ट्रीय लोक, त्या आम्हां सर्वांस चाखित बसणे भाग पडले, हे महशूरच आहे !

असो, जुने ऐतिहासिक लेख मिळवून त्यांच्या अस्सलपणा बद्दल खात्री करून घेऊन तो शाबित करावा व त्यांच्या अभ्यासाने जे सिद्धांत निघतील ते महाराष्ट्रापुढे निर्भिडपणे मांडावेत हेच इतिहास संशोधकाचे खरे कर्तव्य आहे व यातच राष्ट्राचे कल्याण आहे असे जाणून राष्ट्राचे विचार लिहून काढले. आज गेली शंभर वर्षे आपण ज्या पेशव्यावर शिव्यांची लाखोली वाहत सुटलो त्याचे शेवटचे वर्तन आता नवीन पुराव्याच्या दृष्टीने कसे दिसते हेही न्यायी महाराष्ट्र उत्सुकतेने ऐकेल असे वाटून हे विचार प्रसिद्ध केले. तूर्त इतकेच म्हणावयाचे आहे की, ज्या व्यक्तीवर केवळ सुखविलासाकरता आळशी बनून महाराष्ट्र इंग्रजांच्या स्वाधीन केला असा आरोप ठेवितो तो आरोप कितपत खरा आहे ? त्या व्यक्ती शिवाय इतर कोणी या कृत्यांत भागिदार होता किंवा काय ? असल्यास दोषाची वाटणी कशी होऊ शकेल ? की हा दोष सर्वस्वी आपण समजत होतो त्याहून निराळ्याच व्यक्तीकडे जाऊन पडेल ? असे काही मुद्दे यावे इतकाच हेतू आहे.

- श्री. विनायक लक्ष्मण भावे, प्रस्तावना, मराठी दफ्तर रुमाल दुसरा

© कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com