श्रीमंत बाजीराव
पेशव्यांनी आपली सेवा स्विकारावी म्हणून त्यांचे मुतालिक अंबाजीपंत पुरंदरे यांना
मल्हारराव होळकर यांनी बापूजी प्रभू यांच्या सांगण्यावरून लिहीलेले विनंतीपत्र ... अंदाजे कालखंड इ.स. १७२१
देवनागरी लिप्यंतर :
श्री शंकर
पंतप्रधान
राजश्री अंबाजीपंत स्वामी
गोसावी यांस सेवेसी
अखंडीत लक्षुमी विराजीत बा
व यशवंत राजमुद्रा विराजीत राजमान्हे
सेवक आज्ञाधारक मल्हारजी
होलकर दंडवत उपरी
येथील शंतोस जाणून श्वकीये शामराजवैभव
लिहीता आज्ञा करणे विशेश बहुत दिवस
आम्ही हाडियाकडे होतो हाली याचा आमचा
बिघाड पडला त्यास्तव आम्ही मोहन सिं
ग राणे त्याजकडे राजश्री बापुजी प्रभूचे
मारुफातीने तजविज करीत होतो मग
यानी *** सायेबाकडे तजविज करून
कागद पाट्विले आहे तरी आम्ही मना
पासून मनसिवियाचे वाटेने ते तजविज
केली आहे तुमच्या चितास उतम दिसो
न येईल तरी उभयेता येकत्र होऊन
उतरे कागदाची मनापासून पाटवणे
कितेक वर्तमान तपसिलवार रो। बापुजी
प्रभू यानी लिहीली आहेत कुली मनास आणू
न उतरे पाटवतो उतरे आलियावरी
राजश्री तुमचे सेवेसी येतील आपण
ईमान कुली मनापासून राजश्रींसी केला
आहे. जेथे यानी आम्हांस ठेवावे तेथे
बिलाकुसूर रहावे जो धनीं चाकर ठेवील
त्यानी ईजतीन ठेवावे चाकरीस उ
जूर नाही बहुत काये लिहीणे ? कृ
पा लोब असो दीजे हे विनंती.
पा लोब असो दीजे हे विनंती.
© कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com