'पानिपत' झाल्यावरही मराठ्यांनी दिल्ली जिंकली

श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या विसाजीपंत बिनिवाले आणि महादजी शिंदे या सरदारांनी पानिपतच्या संहारानंतर अवघ्या दहा वर्षातच दिल्ली जिंकली त्याबद्दलची माहिती सांगणारे दि. १७ मार्च १७७१ रोजीचे पत्र.


॥ श्री ॥

राजश्रीया विराजीत, राजमान्य राजश्री बाबुरावजी स्वामीचे सेवेसी,
          पो। रामचंद्र शिवदेव सां। नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता। चैत्र शुध १ जाणून स्वकीय लेखन केले पाहीजे विशेष. आपण गेल्यादारभ्य पत्रद्वारा सांभाल होत नाही तरी यैसे नसावे. घरी पत्र येतच आहेत त्याजबरोबर स्मरण पुरस्कर आमचाही परामर्श करावा उचित आहे. राजश्री विसाजीपंत दादा यानी व श्रीमंत राजश्री माहादजीबावा शिंदे याणी सारे सरदार मतात मेलऊन येकविचारे दिल्लीचा बंदोबस्त किल्ल्यासुधा केला म्हणौन कलले. तर ही महत्कृत्ये खावंदांची सेवकाचे हाते घडावी हे फल. स्वामी सेवेवर येकनिष्ठ तिकडे आहे. पुढे पातशाही बंदोबस्त होऊन पातशाह स्थापून येक्या सूत्रे सारे मंडल वर्तऊन सरकार किफायत करणे ह्या गोष्टी खावंदांचे प्रतापे घडून यश येकनिष्ट सेवकाकडेच आहे. वरचेवर कृपापत्री संतोषवीत जावे. बहुत काय लिहीणे ? लोभ कीजे हे विनंती. संदर्भ : लेखांक २६६, पेशवे दफ्तर खंड २९ (संपादक गो. स. सरदेसाई)


© कौस्तुभ कस्तुरे   ।    kasturekaustubhs@gmail.com