'समर्थ'ची प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी दि. ३० मे २०१९ पर्यंत पुढील दुकानांमध्ये सुरु आहे

अक्षरधारा बुक गँलरी, पुणे । पाटील एंटरप्राईजेस, पुणे । उज्ज्वल बुक डेपो, पुणे । न्यू नेर्लेकर बुकसेलर्स, पुणे । नेर्लेकर बुक डेपो, पुणे । अशोक अनंत नेर्लेकर, पुणे । वर्मा बुक सेंटर, पुणे । उत्कर्ष बुक सर्व्हीस, पुणे । अभंग बुक डेपो, पुणे । पुस्तकपेठ, पुणे । सरस्वती ग्रंथ भांडार, कल्याण । मॅजेस्टिक बुक हाऊस, डोंबिवली । गद्रे बंधू, डोंबिवली । श्रद्धा प्रकाशन, डोंबिवली । विनीत बुक डेपो, डोंबिवली । मँजेस्टिक बुक डेपो, ठाणे । आयडियल बुक कंपनी, दादर, मुंबई । भारतीय पुस्तकालय, लातूर । मराठी दालन, लातूर । साहित्य प्रसार केंद्र, नागपूर । मेहता बुक सेलर्स, कोल्हापूर । बुक गंगा, पुणे । जितेंद्र जैन, औरंगाबाद । प्रशांत सबनीस,सातारा । भूषण उद्योग, अकोला । महाराष्ट्र बुक डेपो, पुणे । उदय एजन्सीज, अहमदनगर । अभिनव बुक डेपो, नाशिक । जवाहर बुक डेपो, विलेपार्ले

मी महाराष्ट्राचा पुत्र आहे

भयाण काळोख्या अंधारात, धडपडत जीव जगत होते,
भरडून चिरडून सुलतानांच्या टापांखाली मरत होते ।
कुणीच वाली उरला नाही; जो तो ईश्वरास विनवित होता,
परी देव अशांत होत नव्हता; अन्‌ महाराष्ट्र मात्र मरत होता ॥१॥

असह्य टाहो महाराष्ट्राचे, ऐकूनी 'शिव' अस्वस्थ होतसे,
शिवनेरी नामे सह्यगिरीच्या कुशित शिवबा जन्म घेतसे ।
मायभूमीचे पांग फेडण्या 'हर हर महादेव' गर्जता झाला,
अन्‌ अवघे मराठे एक होऊन महाराष्ट्र सुखाचे लेणे ल्याला ॥१॥

अतुल पराक्रमे बाजीरायाच्या दिल्ली ती थरकापून उठली,
सिंधू नदीच्या पैलतीरावर मराठी घोड्यांची टाप उमटली ।
स्वधर्मशत्रूस चाप लावूनी अटकेपार झेंडे फडकले,
शिवरायांचे स्वराज्य स्वप्न अखिल आर्यावर्ती उमलले ॥२॥

दोन शतके स्वर्गानंदाची महाराष्ट्राने अनुभविली,
परवशतेतून आंग्लभूतींच्या स्वतंत्र पताका फडफडली ।
स्मरण करुनी आज तयांचे वंदन करुया वीरांना त्या,
मंगलदेशी महाराष्ट्राला, अर्पुया दान बहुमानाचे ॥३॥

पुन्हा उभारु गुढी जरिची, शौर्याची अन स्वातंत्र्याची,
स्वाभिमानाची, कलाचातुर्याची, प्रगतीची, उज्ज्वल भविष्याची ।
धर्म पंथ अन्‌ जातकुळीची कास आज मी सोडत आहे,
शिवरायांना वंदन करीतो, 'मी महाराष्ट्राचा पुत्र आहे' ॥४॥


(२४ नोव्हेंबर २०१०)
- © कौस्तुभ कस्तुरे