राजमंडल
ईनाम सु॥सलास
गोविद गोपाल ढगोजी
मंगोजी हे मौजे वढू त॥ पा
बल येथे राहून कैलासवासी
याचे वृंदावनापासी राहून
झाडलोट करिताती या
करीता नफरमजकूरास मौजे
मजकूरापैकी पडजमीन
गोविद गोपाल ढगोजी
मंगोजी हे मौजे वढू त॥ पा
बल येथे राहून कैलासवासी
याचे वृंदावनापासी राहून
झाडलोट करिताती या
करीता नफरमजकूरास मौजे
मजकूरापैकी पडजमीन
छ २४ शाभान सन सलास
जमीन बिघे
b ५
{इनाम कमिशनचा शिक्का}
शंभूछत्रपती महाराजांच्या वढू-बुद्रूक येथील वृंदावनाचा परिसर स्वच्छ करण्यासाठी राजमंडळाने म्हणजे अष्टप्रधान मंडळाने गोविंद गोपाळ ढगोजी आणि मंगोजी यांना दिलेले ईनामपत्र. येथे केवळ छ २४ शाभान सुहूरसन सलास असे दिले असल्याने नक्की वर्ष समजत नाही, परंतू ते शुक्रवार दि. ३१ मार्च सन १६९३ (सलास=३) चे म्हणजेच चैत्र शु ५ शके १६१५ चे असावे.
स्रोत - ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा : सदाशिव शिवदे.
मोडी - देवनागरी लिप्यंतर : कौस्तुभ कस्तुरे
© All rights reserved