'समर्थ'ची प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी दि. ३० मे २०१९ पर्यंत पुढील दुकानांमध्ये सुरु आहे

अक्षरधारा बुक गँलरी, पुणे । पाटील एंटरप्राईजेस, पुणे । उज्ज्वल बुक डेपो, पुणे । न्यू नेर्लेकर बुकसेलर्स, पुणे । नेर्लेकर बुक डेपो, पुणे । अशोक अनंत नेर्लेकर, पुणे । वर्मा बुक सेंटर, पुणे । उत्कर्ष बुक सर्व्हीस, पुणे । अभंग बुक डेपो, पुणे । पुस्तकपेठ, पुणे । सरस्वती ग्रंथ भांडार, कल्याण । मॅजेस्टिक बुक हाऊस, डोंबिवली । गद्रे बंधू, डोंबिवली । श्रद्धा प्रकाशन, डोंबिवली । विनीत बुक डेपो, डोंबिवली । मँजेस्टिक बुक डेपो, ठाणे । आयडियल बुक कंपनी, दादर, मुंबई । भारतीय पुस्तकालय, लातूर । मराठी दालन, लातूर । साहित्य प्रसार केंद्र, नागपूर । मेहता बुक सेलर्स, कोल्हापूर । बुक गंगा, पुणे । जितेंद्र जैन, औरंगाबाद । प्रशांत सबनीस,सातारा । भूषण उद्योग, अकोला । महाराष्ट्र बुक डेपो, पुणे । उदय एजन्सीज, अहमदनगर । अभिनव बुक डेपो, नाशिक । जवाहर बुक डेपो, विलेपार्ले

उद्गिरच्या लढाईसंबंधी विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांचे नानासाहेबांना पत्र


श्री

विनंती सेवक विठल सिवदेव कृ
तानेक साष्टांग नमस्कार विनंती
विज्ञापना येथील कुशल ता।
छ २१ जमादिलौवल मंदवार मु॥
हेर जाणून स्वामीचे कृपेकरून
येथास्तित असे विशेष काल छ २०
रोजी वर्तमान सेवेसी लिहीले होते की
मोगल उदगिरीपलीकडे दों को
सावर घाटाखाले होता जाधवराया
चा मुकाम मात्र फौजेचा उदगि
रीवर होता आम्हांकडील लोक जाऊन
कहीची ऊटे सत्रा आठरा काही तटे
येसी घेऊन आले काल मोगलाचे कूच
होणार होते ते मुकामच जाला खासे जा
धवराव काही फौजेत नवते माग फौजे
मृगावर होते ते आज प्रहरा दिवसा
आम्ही तयार होऊन त्याच्या गोटा
सेजारी मालावर जाऊन उभे राहीलो तो
तेही पलिकडून येऊन दाखल जाले होते
तो आम्ही गेलो मग त्याचे कूच होऊ
न ढाला पाडून गावात शेहरात
राहीले किल्ल्यावरील तोफा जाल्या
मग आम्ही मोगलाच्या रोखे गेलो
उजवे होते जाधवराव उदगिर डावे होते
लस्कर ऐसी जागा पाहून डोंगर होता
तेथे उभे राहीलो लुगारे डोंगर आड
दरा होता आम्हांस चालून जाता नये
ना त्यास येता न ये यैसी बाकी जागा हो
लुगारे राऊत डावे उजवे होऊन नबा
बाच्या लस्करासेजारी जाऊ तीस
चालीस बईल दोन च्यार बंदुखा
येक बाण लगिचा येसा घेऊन
आले तो पावणे दोन प्रहर जाले अ
सता नबाबाचे येकाकीच डेरे पडू
लागले फौजा तयार होऊन पुढे आल्या
मागून कूच होऊन फौजा हरोल

(* इथपासून पुढील दुसर्‍या पानावर *)

आला मागून बुनगे नबाब यैसे
जो दरा वाटेचा त्या माथ्यावर आम्ही
करोल उतरून आवाज केले मग त्या
पलिकडे दुसरी वाट आडवाटेने हरोल
चढून त्या पलिकडील रस्ता त्याने
तोफखाना यैसे चढोन आले नबाब
आले तेव्हा हरोल किल्ल्या से
जारी आला मागोन चडोल चालिला
येसी सर्व फौजसुद्धा मुकाम
उदगिरीपाठीसी देऊन मुकाम
जाला ढाला जाल्या नव्हत्या हरोल मात्र
आला दिवस सा सात घडी राहि
ला मग आम्ही सरून माघारे आलो
छेबिन्यास व रात्री कहीवर घालावे
याकरीता आम्हांकडील लोक व दारकोजी
निंबालकर यैसे ठेविले आम्ही आलो मो
गल दाहा हजारापर्यंत आहे सिवाये प्यादा गार
दी बुनगे येकचे होते दाहा हजार पर्यं
त तेही असतील सिवाये तोफा येण
प्रा। आहे उदईक कूच होईल की मु
काम होईल ते पाहावे त्याप्रो। सेवेसी लि
हून कलऊ श्रृत होये हे विज्ञापना

उद्गिरच्या लढाईसंबंधी विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांचे नानासाहेबांना पत्र... १२ जानेवारी १७६०
स्रोत : Illustrative Modi Documents published by Maharashtra State Archives
          (महाराष्ट्र पुराभिलेखागार प्रकाशित माहीतीपूर्ण निवडक मोडी कागदपत्रे)