'समर्थ'ची प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी दि. ३० मे २०१९ पर्यंत पुढील दुकानांमध्ये सुरु आहे

अक्षरधारा बुक गँलरी, पुणे । पाटील एंटरप्राईजेस, पुणे । उज्ज्वल बुक डेपो, पुणे । न्यू नेर्लेकर बुकसेलर्स, पुणे । नेर्लेकर बुक डेपो, पुणे । अशोक अनंत नेर्लेकर, पुणे । वर्मा बुक सेंटर, पुणे । उत्कर्ष बुक सर्व्हीस, पुणे । अभंग बुक डेपो, पुणे । पुस्तकपेठ, पुणे । सरस्वती ग्रंथ भांडार, कल्याण । मॅजेस्टिक बुक हाऊस, डोंबिवली । गद्रे बंधू, डोंबिवली । श्रद्धा प्रकाशन, डोंबिवली । विनीत बुक डेपो, डोंबिवली । मँजेस्टिक बुक डेपो, ठाणे । आयडियल बुक कंपनी, दादर, मुंबई । भारतीय पुस्तकालय, लातूर । मराठी दालन, लातूर । साहित्य प्रसार केंद्र, नागपूर । मेहता बुक सेलर्स, कोल्हापूर । बुक गंगा, पुणे । जितेंद्र जैन, औरंगाबाद । प्रशांत सबनीस,सातारा । भूषण उद्योग, अकोला । महाराष्ट्र बुक डेपो, पुणे । उदय एजन्सीज, अहमदनगर । अभिनव बुक डेपो, नाशिक । जवाहर बुक डेपो, विलेपार्ले

लालमहाल आणि शनिवारवाडा

हल्ली पेशव्यांनी "लाल महाल" पाडून मुद्दाम त्याच जागी  "शनिवारवाडा" बांधला अशा प्रकारचे गैरसमज मुद्दाम पेशवेद्वेष आणि बराह्मणद्वेषातून पसरवले जात आहेत. जे लोक पेशव्यांनी "लाल महाल" पाडून शनिवारवाडा बांधला, लाल महाल हाच मूळ शनिवारवाडा आहे इत्यादी बडबडतात त्यांनी पुढील नोंद नीट वाचावी.
इतिहाससंशोधक गणेश हरी खरे यांनी आपल्या "शनिवारवाडा" या माहितीपर पुस्तिकेत वाडा कोठे आणि कसाअ बांधलायाचे सप्रमाण संदर्भ आणि पुरावे दिले आहेतच. कै. खरे हे मंडाळाचे एक ज्येष्ठ आणि विद्वान संशोधक होते, त्यांच्या "शनिवारवाडा" मध्ये दिलेली माहिती प्रत्येक पुराव्याच्या कसोटीवर आहेच, पण अखेरीस जे लोक स्वतःला खर्‍यांपेक्षा मोठे समजत असतील त्यांनी १७३५ मधील पेशवा रोजनिशीतील या नोंदी वाचाव्यात.. खाली दिलेल्या पहिल्या नोंदीत स्पष्ट लालमाहालाचा उल्लेख आहे. शनिवारवाडा १७३१ मध्ये बांधला. पत्राचा सारांश असा- "दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांकरीता बांधलेल्या लालमहालामध्ये राणोजी शिंदे आणि त्यांचे कारभारी रामचंद्रपंत (सुखटणकर) यांना राहण्यासाठी नवी घरे बांधली". पुर्वी पुणे अनेक वर्षे मोंगलांकडे असल्याने यावेळी लालमाहालाची बहुतांशि पडझड झालेली होती. त्यामूळे रामचंद्रपंतांना डागडुजी करावी लागली त्याचा उल्लेख या पत्रात आहे.


याशिवाय ही पुढची नोंद.. यामध्येसुद्धा "सिंदीयास हली नवे घर लालमहाल जुना त्यामधे बांधले तेथे राहणार" असे नमुद आहे. या दोन्हीही नोंदी इतिहास संशोधक कै. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी पेशवे दफ्तर खंड २२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत !! आता कोणाला याउपरही शंका घ्यायची असल्यास ते साशंक "इतिहासकर्ते" (नव्याने अज्ञात इतिहास निर्माण करणारे) आहेत हे मान्य..
शनिवारवाड्याची आणखी माहिती हवी असल्यास पुढील दुव्यावर क्लिक करावे


- कौस्तुभ कस्तुरे