दि. १६ एप्रिल १८०१ रोजी विठोजी होळकरांच्या शनिवारवाड्यासमोरील अंमलात आलेल्या शिक्षेने यशवंतराव चिडले आणि त्यांनी पुण्यवर हल्ला केला असे सांगितले जआते, परंतू पेशवे दफ्तर खंड ४१ मध्ये यशवंतरावांचे बाजीरावसाहेबांना या शिक्षेनंतर २ महिन्यांनी, दि १७ जून १८०१ रोजी लिहीलेले एक पत्र छापले आहे, ज्यात यशवंतराव स्पष्ट म्हणतात, "विठलराव होलकर याणी स्वामीची आज्ञा न घेता श्री पंढरपुराकडे जाऊन क्षेत्रास उपसर्ग दिल्यामूळे (पेशव्यांची) इतराजी होऊन प्रकार घडला तो समजला. तथापी स्वामीचे हाते जे घडेल ते शेवक लोकास श्रेयस्कर आहे". यावरून 'विठोजी'च्या शिक्षेमूळे नव्हे तर शिंदे-होळकरांच्या अंतर्गत कलहामूळे आणि शिंदे बाजीरावांच्या बाजूने उभे राहिल्याने होळकरांनी शत्रूत्व पत्करले हे उघड होते. पेशवे दफ्तर खंड ४१ मधील याशवंतरावांचे ते पत्र पुढे जसेच्या तसे देत आहे-
- कौस्तुभ कस्तुरे.
- कौस्तुभ कस्तुरे.