कागद १)
इंग्रजी अमदानीत लेण्याद्री आणि नाशिकजवळच्या डोंगरात असलेल्या लेण्यांमधील शिलालेख वाचून त्याच्या नकला करून घेण्याबद्दल दि. १५ जुलै १८१९ चा एक कागद -
श्री
यादी नासिकचे नजीक डोंगरात व जुनरा
जवल लेण्याद्रीत पुरातन लिप आहे त्याचे बरना (?)
हुबहू लिहून काढून त्याच्या दोन नकला बारीक
अक्षरे चितारी याजकडून लिहीवील्या त्यास
खर्च येकंदर सु|| तिसा असरे रुये
१० लेण्याद्रीनजीक जुनर येथे प|| त्यास खर्चास दिले
११० नासिकचे नजीकचे लिहिण्याकडे
४५ कागद शाई व कामदार कारकून यास
भोजन खर्च व मजूर माणसाचा रोजमरा येथे
६५ चितारे सोनार वगैरे आग ४ यांस येकमाही
४५ आग ३ दर १५ प्रमाणे
२० कुशाबा चितारा
---
६५
------
११०
६० पुणे मु|| बारीक बरफ (?) दोन नकला केल्या त्याची म
जरी चितारे यास दरशेकडा रु|| १ प्रमाणे
५० नासिकास कारकून रामचंद्र हरी जोगलेकर यास ठे
विले त्यास दुमाही
------
२३०
कागद २)
एल्फिन्स्टनने ९ रुपये किमतीची तांब्याची चिलीम पुण्यातील रस्ते पेठेतील एका कासाराकडून विकत घेतली त्यासंबंधीचा दि. २ डिसेंबर १८१८ चा कागद -
भुजेंगसेट बिन खंडूजी कासार वा|| पुणे पेठ रास्ते चिलमची तांब्या
ची करून दिल्ही त्याजब|| रुये ९ नव भरून पावलो बडेसाहेब
याजकडे चिलमची दिल्ही त्याजबदल रुये भरून पावलो
कागद ३)
कॅप्टन फोर्ड याने १२१२ रुपये किमतीची एक शालजोडी एल्फिन्स्टनला भेट द्यायला विकत घेतली त्याची ज्या व्यापाऱ्याकडून कापड घेतले त्याच्याकडून मिळालेली दि. १७ सप्टेंबर १८१८ रोजीची पावती -
श्री
साहेब मेहेरवाण बुनतावत (?) जिम साहेब
आज्ञाधारक बापू वामणे सिंपी कापडकरी पेठ बुधवार सला
म आम्ही शालजोडी १ आसमाणी रंगांची रुये १२१२ बाराशे
बारा साहेब पोट याणी खरीदी करून बडेसाहेब यास
दिल्ही ते बारासे बारा रुये एकासी आपण दिल्हे ते भरून
पावलो मिती शके १७४० बहुधान्यानाम संवछरे तारी
ख १७ सप्तंबर सन १८१८
शोध आणि छायाचित्र सौजन्य :
श्री. संकेत कुलकर्णी (लंडन)
ब्रिटिश लायब्ररी, लंडन
लिप्यंतर : कौस्तुभ कस्तुरे

***********
शोध आणि छायाचित्र सौजन्य :
श्री. संकेत कुलकर्णी (लंडन)
ब्रिटिश लायब्ररी, लंडन
लिप्यंतर : कौस्तुभ कस्तुरे