प्रणाम स्वातंत्र्यवीरा !


मायभूमीचे कृतार्थ जीवन,
घेतलेस त्वां जरी हे दर्शन,
उगाच संभ्रम हा दावी मन,
नजरबंदीचा खरा...
आर्जव हेचि तुम्हांस करितो,
प्रणाम स्वातंत्र्यवीरा !

देव, देश अन धर्म बुडाला,
देशभक्त हा परवश झाला,
कुणास पारावार न उरला,
पाही आपुले घरा ...
आर्जव हेचि तुम्हांस करितो,
प्रणाम स्वातंत्र्यवीरा !

एक लक्ष हे नजरेपुढती,
कधीच नच घडली विश्रांती,
तुम्हीच केली ही युगक्रांती,
तीच मागुती करा ...
आर्जव हेचि तुम्हांस करितो,
प्रणाम स्वातंत्र्यवीरा !

स्वप्न दिसे हे मनी कल्पांती,
आत्मबलाची नाच हि भ्रांती,
एक शब्द तो द्या हो मजप्रती,
'आशीर्वाद' हा खरा ... 
आर्जव हेचि तुम्हांस करितो,
प्रणाम स्वातंत्र्यवीरा !(२८ फेब्रुवारी २०११)
© कौस्तुभ कस्तुरे । www.kaustubhkasture.in