महाराष्ट्रपुत्रास..

आज  साडेतीनशे वर्षांपूर्वीची वर्षांपूर्वीची परिस्थिती उद्भवली, आणि आपल्यातलाच एक कोणीतरी पुन्हा स्वातंत्र्याच्या सूर्योदयासाठी बंड करून उठला, तर तो लोकांस कसे स्फुरण चढवेल बरे ?


एक हाती खड्ग घेऊ, एक हाती पुष्प हे, 
प्राण तो तळहाती आहे, हृद कधी ना रुष्ट हे !
या गड्यांनो जिंकूया, दही दिशा बलवत्तरी,
एकची मनी आस आहे, व्हावे येथ स्वराज्य हे !!

उठ रे महाराष्ट्रपुत्रा, बाळगी अभिमान रे,
कैलासाचा रुद्र तू, अन तूच कि हनुमान रे !
एकदा मळवट भारी हा, रक्तवर्णी लाल तू,
मग उराशी दाटुनी घे, शिवप्रभूंच्या प्राण रे !!

आर्यभूमीतले चऱ्हाटे, मार्गीचे उन्मत्त जे,
दंड करुनि दे तयांना, मृत्यूची ती लक्तरे !
ज्ञात व्हावे या जगासी, कोणते तंव कुळ ते,
राजियांचा मावळा, अन समर्थांचा भक्त रे !!

(११ मार्च २०११)
- © कौस्तुभ कस्तुरे