'समर्थ'ची प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी दि. ३० मे २०१९ पर्यंत पुढील दुकानांमध्ये सुरु आहे

अक्षरधारा बुक गँलरी, पुणे । पाटील एंटरप्राईजेस, पुणे । उज्ज्वल बुक डेपो, पुणे । न्यू नेर्लेकर बुकसेलर्स, पुणे । नेर्लेकर बुक डेपो, पुणे । अशोक अनंत नेर्लेकर, पुणे । वर्मा बुक सेंटर, पुणे । उत्कर्ष बुक सर्व्हीस, पुणे । अभंग बुक डेपो, पुणे । पुस्तकपेठ, पुणे । सरस्वती ग्रंथ भांडार, कल्याण । मॅजेस्टिक बुक हाऊस, डोंबिवली । गद्रे बंधू, डोंबिवली । श्रद्धा प्रकाशन, डोंबिवली । विनीत बुक डेपो, डोंबिवली । मँजेस्टिक बुक डेपो, ठाणे । आयडियल बुक कंपनी, दादर, मुंबई । भारतीय पुस्तकालय, लातूर । मराठी दालन, लातूर । साहित्य प्रसार केंद्र, नागपूर । मेहता बुक सेलर्स, कोल्हापूर । बुक गंगा, पुणे । जितेंद्र जैन, औरंगाबाद । प्रशांत सबनीस,सातारा । भूषण उद्योग, अकोला । महाराष्ट्र बुक डेपो, पुणे । उदय एजन्सीज, अहमदनगर । अभिनव बुक डेपो, नाशिक । जवाहर बुक डेपो, विलेपार्ले

शाहू महाराजांचे नारो शंकर सचिवांना पत्र

शंकराजी नारायण सचिव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे पुत्र नारो शंकर सचिव यांना वंशपरंपरागत दिलेले सचिवपणाचे हक्क याबद्दलचे दि. २९ एप्रिल १७०८ सालचे हे पत्रं. या पत्रात शाहू महाराजांनी ते लहान असताना, औरंगजेबाच्या कैदेत असताना शंकराजीपंत आणि रामचंद्रपंत यांनी किती मेहनतीने राज्य राखले याचाही उल्लेख केला आहे.


स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३३ सर्वजीतनाम संवत्सरे वैशाख वद्य पंचमी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शाहूछत्रपति स्वामी यांनी समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री नारो शंकर पंडित सचिव यांस आज्ञा केली ऐसी जे किल्ले चंदन येथील मुक्कामी तुम्हांकडून राजश्री त्रिंबक शिवदेव मुतालिक सुरनीसी यांनी येऊन विनंती ककेलि की शंकराजी नारायण यांनी आंबवडियाचे मुक्कामी देहविसर्जन केले; नारो शंकर लहान, यांजकरिता त्यांजकडे किल्ले कोट दौलत स्वामींची आहे याचा बंदोबस्त हुजूरून व्हावा, दौलतीस कर्जवाम होऊन बहुत खराबीत आहे, म्हणून विनंती केली. ऐशियास, शंकराजीपंत इमानी, आम्ही पादशाहास हस्तगत होऊन त्याचे सैन्यात होतो, तीर्थस्वरूप कैलासवासी काकासाहेब महालासुद्धा कर्नाटकप्रांती होते. अशा वेळी इकडे राजश्री रामचंद्रपंतांनी सरदारांची सरबराई करून ठायीठायी किल्लोकिल्ली लढाया देऊन कर्नाटकात फौज रवाना करून तिकडील बंदोबस्त राखून गेले. किल्ले महामर्दीने जातीनिशी मेहेनत करून घेऊन स्वामींचे राज्य रक्षिले. त्यांचे वंशाचे चालविणे स्वामींशी बहुत आवश्यक. त्यांचा जिल्हा, मामला, वतने व इनामगाव त्याप्रमाणे चालविले पाहिजेत. त्याजवरून हल्ली स्वामी तुम्हांवरी कृपाळू होऊन शंकराजी नारायण यांजकडे सुरनिशी चालत होती, मृत्यू पावले, यांजकरिता यांजकडून दूर करून तुम्हांस सुरनिशी अजरामरामत करार करून वस्त्रे बहुमान दिल्हा असे. तुम्हांस जातीस तैनात सालीना बद्दल माजी होन १०००० दहा हजार करार केले असेल. याचे ऐवजी तुम्हांकडे सरंजाम गाव चालत आहेत ते व इतलाख पावत आल्याप्रमाणे पावत जाईल; व वतने, इनामगाव पेशजीपासून चालत आल्याप्रमाणे तुम्हांस व तुमचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने चालविले जाईल. जिल्हा, मामला, किल्लेकोट तुम्हांकडे आहेत त्याप्रमाणे करार करून दिले असेत. त्यास किल्लेकोटाचा खर्च व दरमहाचा ऐवज सालाबाद नेमणुकीप्रमाणे पाववीत जाणे. तुमचे जिल्ह्यातील किल्लेकोट सुटतील ते तुम्हांकडे ठेविले जातील. पादशाहीचे लढायांमुळे तुम्हांस कर्जवाम झाले आहे, त्याचा निर्वाह झाला पाहिजे व तुमचे वडिलांनी इमाने सेवा केली आहे, याजकरिता स्वामींचे राज्य असेल तोवर तुमच्या जिल्हेमामल्याची वंशपरंपरेने घालमेल होणार नाही येविषयी श्री शंभूमहादेव याची शफ्तापूर्वक आश्रय असे. तुम्ही इमानेइतबारे यथान्यायें वडिलांचे वेळेस लोक स्वामीकार्यास आले आहेत, त्यांचे व प्रजेचे पालनग्रहण करीत जाणे. स्वामी तुमचे सेवेचे कर्तृत्व पाहून उत्तरोत्तर उर्जित करीत. जाणिजे, बहुत काय लिहिणे तरी सुद्न्य असा. मोर्तब. तेरिख १७ सफर सु|| समान माया व अलफ. पत्राचा स्रोत: ऐतिहासिक पत्रव्यवहार, लेखांक ३ (संपादक: सरदेसाई, कुलकर्णी, काळे)