वसई घेतल्यानंतर चिमाजी अप्पांनी ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांना लिहीलेले पत्र

वसईचा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यातून सोडवल्यानंतर चिमाजीआप्पांनी ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांना दिलेले ईनामपत्र .. "वसई स्वामींच्या आसिर्वादे.." इथपासून पुढचे अक्षर अप्पांचे आहे..
श्री


श्रीमंत माहाराज श्री       परमहं
स बावा स्वामीचे सेवेसी
चरणरज चिमणाजी बलाल कृतानेक विज्ञा
पना येथील वर्तमान तागाईत वैशाख वद्य
प्रतिपदा पावेतो माहाराजांचे आसिर्वादे
करून येथास्तित असे विशेष स्वामींचे
आज्ञेप्रमाणे श्रीनिवास मेहर यांजसमागमे
पुतल्या                         रुपये
        १२५                        १२५
येकून सवासें पुतल्या व सवासे रुपयें पा
ठविले आहेत सेवेसी प्रविष्ट जाहलीयांचे
उतर सादर केले पाहीजे वसई स्वामीं
च्या आसिर्वादे फते जाली यां
चे वृत विस्तारे काल लेहून से
वेसी विनंतीपत्र पाठविले आ
हे ते पुण्याहून रा। अंताजी ना
रायेण यानी स्वामीचे सेवे
सी पावते केलेच असेल सेवेसी
श्रुत होये हे विज्ञापना
                            लिप्यंतर: कौस्तुभ कस्तुरे

All rights reserved by Kaustubh Kasture