थोरल्या बाजीरावांचे मुत्सद्दी राजकारण

महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक राजघराणी होऊन गेली. त्यात वाकाटकांपासुन चालुक्यांपर्यंत आणि सातवाहनांपासून यादवांपर्यंत अनेक राजघराण्यांनी महाराष्ट्राच्या ओंजळीत पुरेपूर माप घातले. 

सतराव्या शतकात श्री शिवछत्रपति महाराजांनी  स्वराज्याची उभरणी केली आणि पुढे श्रीमंत पेशव्यांनी त्या वैभवाला एका उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवले.

याच पेशवाईच्या कारकीर्दीसंबंधी महाराष्ट्रात अनेक वादंग निर्माण झाले.

उदाहरणार्थ सांगायचेच झाले तर श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी १७३७ मध्ये दिल्लीवर आक्रमण केले परंतू दिल्ली जिंकून घेतली नाही. लोकांना असे वाट्ते की बाजीरावसाहेबांनी दिल्ल्ली जिंकून घ्यायला पाहीजे होती. परंतू त्याचे मुख्य कारण असे आहे की आजही आपण राज्यात एखादी दुर्दैवी घटना घडली तरी राज्याच्या मुख्यमंत्र्याला जबाबदार धरतो. आपण मुख्यमंत्री ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाच्या मुख्याला जबाबदार धरत नाही. तसेच राजकारण बाजीरावसाहेबांनी केले. हिन्दुस्थानात एखादी घटना घडली तरी हिंदुस्थानातले लोक दिल्लीच्या बादशहाला जबाबदार धरणार, पेशव्यांचा तिथे काहीही संबंध नाही. परंतू दिल्लीच्या बादशहाच्या रक्षणार्थ बाजीरावसाहेब धाऊन जातात म्हणून दिल्लीच्या बादशहाकडून दरसाल रसद आणि पैसा मिळत असे. अर्थात बाजीराव पेशव्यांच्या या नीतिमूळे मराठ्यांचा खजिना भरू लागला हि गोष्ट अतिशय महत्वाची झाली. दक्षिणेत वर्चस्व आणि उत्तरेत राजकीय नेतृत्व हे बाजीराव पेशव्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. मराठ्यांच्या उत्तराभिमुख राजकीय धोरणाचे बाजीराव पेशवे हे जनक होते. दक्षिणेत बसून उत्तर जिंकण्याचा त्यांचा हा प्रयत्न केवळ उत्कृष्ट्च नाही तर अपूर्व होता.

स्वराज्य संस्थापक म्हणून इतिहासातील शिवाजी महाराजांचे स्थान अढळ आहे. त्यांनी संपादन केलेले स्वराज्य टिकवण्यासाठी मराठी माणसाने औरंगजेबाशी सतत पंचवीस वर्षे निकराने लढा दिला. असंख्य प्राणांची आहुती दिली. धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. परंतू यापूढे मराठी सत्ता टिकवण्यासाठी बाजीरावांनी प्रयत्न तर केलेच, आणि शिवाय त्यांनी मराठ्यांच्या कर्तृत्वाला नवे आव्हानही दिले, त्यांच्या कार्यकक्षा वाढवल्या आणि मराठी मुलुखाला खरा "महाराष्ट्र" बनवले. गुजरात, माळवा, बुंदेलखंड, राजस्थान, दिल्ली, इतकंच नव्हे तर पुढे पार सिंधू नदीच्या पैलतिरावर मराठी घोड्यांच्या टापा उमट्ल्या.

आयुष्याच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या काळात थोरल्या श्री शिवछ्त्रपतिंचे स्वप्न अल्पावधित पूर्ण करणारे बाजीरावसाहेब आपल्या वीस वर्षांच्या पेशवाईच्या काळात सधारणतः बत्तीस लढाया खेळले. आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे यातली एकही लढाई ते हरले नाहीत. जगाच्या इतिहासात आजवर अनेक नामवंत योद्धे होऊन गेले. मग त्यात सिझर पासून अलेक्झांडर पर्यंत आणि ऑगस्ट्स पासून नेपोलिअन पर्यंत असे अनेक वीर होऊन गेले. बाहेरचं सोड, परंतू आपल्याकडेही सातवाहनांपासून यादवांपर्यंत अनेक राजघरण्यात अनेक महापराक्रमी राजे होऊन गेले. परंतू यातील प्रत्येक राज्यकर्ता आपल्या आयुष्यात कधी ना कधी एकतरी लढाई हरला होताच ! परंतू जगाच्या इतिहासात केवळ बाजीराव पेशवे हे एकमेव वीर असे आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यात एकही लढाई हरली नाही. हा वीर योद्धा कायम अजिंक्यच राहीला.

आणि म्हणुनच बाजीराव हे बृहत्तर महाराष्ट्रचे निर्माते म्हणून अजरामर झाले...

बंगाली इतिहासकार श्री जदुनाथ सरकार यांनी बाजीराव पेशव्यांबद्दल म्हटलं आहे -.... बाजीराव पेशव्यांची भूमिका विजेत्याची होती. बंदिस्त कारभार आखून देणार्‍या प्रशासकाची नव्हती.... अश्वदलाचा तो सर्वश्रेष्ठ नेता होता... अस्थिर झालेल्या मराठी राज्याचे स्वातंत्र्य त्यांनी पक्के केले. त्यांच्या संभाव्य विस्ताराचा मार्गही आखून दिला आणि त्यांना हिंदुस्थानच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या या कर्तबगारीमूळे मराठेशाहीत शिवाजीराजांच्या नंतरच्या कर्तृत्ववान पुरूषांत बाजीराव पेशव्यांची गणना सर्वप्रथम केली पाहीजे. शिवाजीराजाने महाराष्ट्रराज्याची निर्मिती केली. त्या देशाला बृहत्तर महाराष्ट्राचे रूप देण्याचा प्रारंभ बाजीराव पेशव्यांनी केला ही गोष्ट सामान्य नव्हे.

आणि म्हणूनच अशा या महाराष्ट्राच्या महान पेशव्याला, श्रीमंत बाजीरावसाहेबांना मानाचा मुजरा....... त्रिवार मुजरा !