'समर्थ'ची प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी दि. ३० मे २०१९ पर्यंत पुढील दुकानांमध्ये सुरु आहे

अक्षरधारा बुक गँलरी, पुणे । पाटील एंटरप्राईजेस, पुणे । उज्ज्वल बुक डेपो, पुणे । न्यू नेर्लेकर बुकसेलर्स, पुणे । नेर्लेकर बुक डेपो, पुणे । अशोक अनंत नेर्लेकर, पुणे । वर्मा बुक सेंटर, पुणे । उत्कर्ष बुक सर्व्हीस, पुणे । अभंग बुक डेपो, पुणे । पुस्तकपेठ, पुणे । सरस्वती ग्रंथ भांडार, कल्याण । मॅजेस्टिक बुक हाऊस, डोंबिवली । गद्रे बंधू, डोंबिवली । श्रद्धा प्रकाशन, डोंबिवली । विनीत बुक डेपो, डोंबिवली । मँजेस्टिक बुक डेपो, ठाणे । आयडियल बुक कंपनी, दादर, मुंबई । भारतीय पुस्तकालय, लातूर । मराठी दालन, लातूर । साहित्य प्रसार केंद्र, नागपूर । मेहता बुक सेलर्स, कोल्हापूर । बुक गंगा, पुणे । जितेंद्र जैन, औरंगाबाद । प्रशांत सबनीस,सातारा । भूषण उद्योग, अकोला । महाराष्ट्र बुक डेपो, पुणे । उदय एजन्सीज, अहमदनगर । अभिनव बुक डेपो, नाशिक । जवाहर बुक डेपो, विलेपार्ले

श्री समर्थ वचन ...


एकीकडे प्रचंड सुलतानी अत्याचार, आणि त्यातच अस्मानी ! भारतभ्रमण करत असताना श्रीसमर्थ रामदासस्वामी पंढरपुरात विठुरायाच्या समोर येऊन उभे राहिले. विठूरायाची सावली मूर्ती कटीवर हात ठेऊन शांतपणे समर्थांकडे पाहत होती, समर्थ सुद्धा विठुरायाकडे पाहत होते.. पण शांतपणे ? त्यांच्या डोळ्यात आर्जवी भाव होते.. समर्थ विनवीत होते, विठूराया, तूच परशुराम, तूच राम आहेस, तूच कृष्ण आहेस ! मागे सहस्त्रार्जुन, रावणादि दैत्यांना तूच मारलंस. अर्जुनासारख्यांना गीता सांगून तूच शहाणं केलंस.. मग आता हे भयंकर अत्याचार होत असताना तू कमरेवर हात ठेऊन नुसता का उभा आहेस इथे ? ये, ये, हा शांत अवतार काही काळ बाजूला ठेऊन पुन्हा तो रौद्र अवतार धारण करून ये, आणि सगळं सावर.. 


या एकंदरीतच परिस्थितीवर मला हे काव्य सुचलं. खरंतर काव्यात शेवटी 'स्वाक्षरी' म्हणून कवीचं नाव असतं, पण का, कसं कोण जाणे, मनात शब्द उमटले ते जणू 'दास (रामदास) विनवी आज तुम्हा' असेच. अजूनही  विचार केला की राहून राहून वाटतं, हे सुचलं तेव्हा खरंच समर्थांनी येऊन विचार सांगितले नसावेत ना ?गणाधीश तो प्रसन्न झाला, परशु देई त्वरा,
श्रांत होऊनि दंड करिसी, सहस्रकरा !
तुम्हीच दिधले ब्राह्मणांस या पृथ्वीच्या दाना,
फिरून यावे परशुरामा, रक्षिण्या हिंदूंस या !

तूच हाती शस्त्र धरिले, मारिले लंकेश्वरा,
अयोद्धेचा पुण्यराणा, तूच तो रघुईश्वरा !
मुक्त करुनि द्विपलंका, पौर रक्षिलेस त्वां,
फिरून ये तू रामराया, रक्षिण्या हिंदूंस या !

अर्जुना उपदेश केला, कर्मयोग महंतीचा,
आर्यलोकी आणिली तू, वैभव सुखसंपदा !
दुष्कृत्यांचा नाश करुनि साधुसंता रक्षिण्या त्या, 
फिरून ये रे केशवा तू, रक्षिण्या हिंदूंशी या !

अनाचारे लुब्ध झाले, संस्कृतीचे थोरपण,
ठेवूनिया कटी करा, वाटते तुज का हे भूषण ?
दास विनवी आज तुम्हां, क्षात्रधुरा सांभाळा या,
वारकऱ्यांच्या विठुराया, रक्षिण्या हिंदूंस या !


चित्र साभार : प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत

(२४ नोव्हेंबर २०१०)
- © कौस्तुभ कस्तुरे