समर्थ- समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन
समर्थ रामदासस्वामी हा महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांच्या श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे तसाच तो अनेकांच्या दृष्टीने वादाचाही विषय आहे. हा वाद सुरु होतो तो छत्रपती शिवाजी महाराजांशी समर्थांचा परिचय होता का नाही, त्यांचे संबंध कसे होते, नातं कसं होतं याबद्दल. सदर 'समर्थ' हे पुस्तक रामदासस्वामींच्या समकालीन कागदपत्रांतून त्यांचं दर्शन घडवतं, त्याप्रमाणेच त्यांच्या समकालीन शिष्य-सांप्रदायिक व्यक्तींनी लिहिलेले त्यांचे अनुभव इत्यादी स्पष्ट करतं.
तीन समकालीन चरित्रे, एक उत्तरकालीन चरित्रं यांच्या आधारे निरनिराळी पत्रे, काव्ये आणि खुद्द समर्थांची शिकवण यातून घडत जाणारे समर्थदर्शन वाचकांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. 


दंतकथा आणि निराधार चमत्काराच्या गोष्टींमध्ये अडकल्याने समर्थांचं वास्तवात जसं होतं तसं चरित्र फारसं जनमानसात पोहोचलं नसल्यामुळे समकालीन कागदपत्रांतून तसेच समर्थांच्या प्रत्यक्ष व्यक्तींच्या लिखाणामधून ते कसे दिसतात, कसे वागतात, कसे बोलतात इत्यादी गोष्टी समजण्यासाठी हा सारा प्रपंच. याशिवाय समर्थांची काही लघुचित्रे, मुख्यत्वेकरून आदिलशाह-समर्थ भेट म्हणून जे चित्रं दाखवलं जातं त्याची सत्यासत्यता वगैरे इतरही मुद्दे सदर पुस्तकात मांडण्यात आले असून त्याशिवाय अस्सल कागदपत्रांची छायाचित्रेही समाविष्ट करण्यात आली आहेत, जेणेकरून वाचकांना इतिहासाचा अंदाज येऊ शकेल.
"समर्थ- समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन"
लेखक : कौस्तुभ कस्तुरे
प्रकाशक : मोरया प्रकाशन 
किंमत : १७० /-महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध


ऑनलाईन नोंदणी आणि घरपोच मिळवण्यासाठी पुढीलपैकी एका संकेतस्थळाला भेट द्या-


मोरया प्रकाशन -


बुकगंगा -


अक्षरधारा -